
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. 12 आणि 13 सप्टेंबर अशी दोन दिवस ही शिखर परिषद पार पडणार आहे. या शिखर परिषदेसाठी चीन, रशिया, इराणसह अनेक प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख हिंदुस्थानात आले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे देखील हिंदुस्थानात आले असून ब्रिक्स परिषदेनिमित्त नवी दिल्लीत आयोजित डिनरदरम्यान त्यांनी चक्क हिंदी सिनेमातील गाणी गात उपस्थितांची दाद मिळवली.
दिल्लीतील हॉटेलमध्ये आयोजित स्नेहभोजनादरम्यान मलेशियन पंतप्रधानांनी 1965 च्या ‘तीन देवियाँ’ या चित्रपटातील किशोर कुमार यांचे “ख्वाब हो तुम या कोई हकीकत…” हे सदाबहार गाणे उत्स्फूर्तपणे गायले. एस. डी. बर्मन यांचे संगीत आणि मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यासोबतच त्यांनी मुकेश यांचे “दोस्त दोस्त ना रहा…” हे गाणेही गुणगुणले.
अनवर इब्राहिम यांनी आपल्या या गाण्याचा सुमारे दीड मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी अत्यंत हलक्या-फुलक्या अंदाजात, “गुरू, थोडं गाण्याची परवानगी आहे का?” असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ‘बोले चुडियाँ’ गाण्याचा बॅकग्राउंड स्कोअर असलेला व्हिडिओ शेअर केला होता.
…जेव्हा मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम किशोर कुमार यांचे गाणे गातात, BRICS मध्ये जेवणानंतर रंगली मैफिल pic.twitter.com/GEvcLOrQfO
— Saamana Online (@SaamanaOnline) September 13, 2026
हिंदुस्थान-मलेशिया संबंधांना नवीन उंची
2022 मध्ये मलेशियाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर अनवर इब्राहिम यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. या ऐतिहासिक दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डिजिटल तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्राला गती देणाऱ्या अनेक करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
इस्रायली पंतप्रधानांच्या मेकअपवर 4 कोटी खर्च, तीन महिन्यांत केसांवर 22 लाख उडवले























































