
वरण-भात असो, खिचडी असो किंवा साधा डाळ-भात… ताटात थोडंसं लोणचं असेल तर जेवणाची चव अधिक खुलते. भारतीय घरांमध्ये लोणच्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. आंबा, लिंबू, मिरची अशा विविध पदार्थांपासून तयार केलेले लोणचे वर्षभरासाठी साठवून ठेवण्याची पद्धत पूर्वीपासून आहे.
लोणचं हे आपल्या पानात डाव्या बाजूला असल्याने, तो पदार्थ कमीच खावा हे शास्त्रानेच सांगितलं आहे. परंतु काहींना मात्र लोणचं हे भरभरून खाण्याची सवय असते. परंतु अति प्रमाणात लोणचे खाणे हे आरोग्यासाठी हितावह नसते.
रोज दही का खायला हवे, आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल
लोणच्याच्या काही आंबवलेल्या प्रकारांमध्ये प्रोबायोटिक्स तयार होऊ शकतात. हे सूक्ष्मजीव आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तयार केलेले आंबवलेले लोणचे आहाराचा भाग होऊ शकते.
मात्र लोणच्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यातील मीठाचे प्रमाण अनेक लोणच्यांमध्ये मीठ आणि तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे लोणचं कितीही आवडत असलं तरी ते मोठ्या प्रमाणात खाणे टाळावे.
वजन कमी करायचंय? रात्रीच्या जेवणात मूग डाळीचा करा समावेश; ‘हे’ फायदे मिळू शकतात
विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त मीठ असलेल्या लोणच्याचे सेवन मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोणचं जेवणाची चव वाढवण्यासाठी थोडं खा, पण त्याचा अतिरेक टाळा.



























































