मदत छावणीत 25 मृत्यू कसे? सुप्रीम कोर्टाची विचारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

मणिपूरमधील आठ मदत छावण्यांमधील संशयास्पद मृत्यू आणि लैंगिक अत्याच्याराच्या प्रकरणांवरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. मणिपूरच्या मदत छावणीत 25 मृत्यू कसे?, अशी संतप्त विचारणा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला केली.

मुख्य न्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. मणिपुरातील 8 जिह्यांतील मदत छावण्यांमध्ये आतापर्यंत 640 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी केवळ 20 प्रकरणांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. या हिंसाचारात 16 जिह्यांमध्ये 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व संशयास्पद मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करावी आणि मृत्यूच्या कारणांची योग्य चौकशी सुनिश्चित करावी, असे कोर्टाने निर्देश दिले.