
मणिपुरात कुकी-नागा यांच्यात हिंसक संघर्ष सुरू आहे. यामुळे येथील शाळा आणि बाजार गेल्या 7 दिवसांपासून बंद आहे. हिंसाचारामुळे लोक प्रचंड घाबरलेले असून घरात कैद आहेत. मणिपुरात जणू काही वैद्यकीय आणीबाणी जाहीर झाली आहे, अशी परिस्थिती आहे.
गेल्या चार दिवसात सशस्त्र अतिरेक्यांनी 4 महिलांसह 6 कुकी लोकांची हत्या केल्याने येथील वातावरण हिंसक झाले आहे. कांगपोकपी या डोंगराळ जिह्यात स्थानिक कुकी लोक आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार संघर्ष झाला आहे. यामुळे हिंसाचार रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी नाकेबंदी वाढवली आहे. काही गावांमध्ये साखर थेट 450 रुपयांवर पोहोचली आहे.
40 जणांचा मृत्यू
या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिटन गावात झालेल्या हिंसेपासून आतापर्यंत या संघर्षात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. उखरुल, सेनापती, तामेंगलोंग, चंदेल हे नागाबहुल, तर चुराचांदपूर, कांगपोकपी, फिरजॉल हे कुकीबहुल जिल्हे आहेत. कांगपोकपीसह 4 जिह्यांमध्ये दोन्ही जमाती एकत्र राहतात. त्यामुळे अतिरेकी दोघांवरही हल्ले करत आहेत.


























































