
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पासून नांदेड महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली.महापौरांच्या संकल्पनेतून स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड ही मोहीम सुरू करण्यात आली.
महापालिकेने या स्वच्छता मोहिमेचा निव्वळ देखावा केल्याचे उघड झाले. नांदेड शहरातील डॉ शंकरराव चव्हाण पुतळा परिसर येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मात्र या ठिकाणच्या स्वच्छ रस्त्यावर महापालिकेनेच अगोदर कचरा आणून टाकला. नंतर मोहिमेची सुरुवात म्हणून पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्वच्छता करण्यात आली.
महापालिकेने आणून टाकलेला कचरा साफ करून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान हा प्रकार पालकमंत्री अतुल सावे यांच्या लक्षात आणून दिल्या नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला याबाबत माहिती नाही, चौकशी करतो असं पालकमंत्री अतुल सावे म्हणाले


























































