
केनियातील नैरोबीला पोहोचल्यानंतर अपहरण करण्यात आलेल्या पंजाबच्या तीन हिंदुस्थानी नागरिकांची केनियातील अधिकाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. या अपहरण प्रकरणी सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही हिंदुस्थानी नागरिकांचे जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक हिंदुस्थानी, दोन पाकिस्तानी आणि दोन केनियाचे नागरिक आहेत.


























































