
बोरिवली पश्चिम येथील हिमालय हायस्कूल येथील कला शिक्षक मनोहर बाविस्कर यांनी एक ते दहा या अंकांचा कल्पक वापर करून रांगोळीच्या माध्यमातून गणपतीचे अप्रतिम रेखाटन साकारले आहे. या अनोख्या कलाकृतीतून गणरायाचे मनोहारी दर्शन घडत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि त्यांच्यात सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी शाळेत नेहमीच असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे मनोहर बाविस्कर यांनी सांगितले.



























































