विरारमध्ये वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडगापाडा येथील रेल्वे उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास घटना घडली. महादेव रत्न चौरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विरारहून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने महादेव चौरे यांना जोरदार धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव चौरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिसांकडून कसून पुढील तपास केला जात आहे.

वीज कोसळून पाच जण ठार, चौघे गंभीर जखमी
सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी दहिगाव, ता. सिल्लोड आणि पिशोर, ता. कन्नड येथे वीज कोसळून पाच जण ठार झाले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतात पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. महसूल प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. पिशोर येथे वाघुलखेडा गट क्रमांक ७१ येथे शेतकरी काम करत होते. गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी सहा जण झाडाच्या आश्रयाने थांबले असताना अचानक वीज कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत.