
दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवरच टीका केली जात आहे. दुष्काळाच्या नावाखाली राजकीय पोळ्या शेकल्या जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याला कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी आज प्रत्युत्तर दिले. शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे सांगतानाच, सरकारला दुष्काळतही राजकारण दिसते, असा पलटवार पटोले यांनी केला आहे. राज्यात एवढा मोठा दुष्काळ पडलेला असतानाही फडणवीस सरकारला अद्याप जाग आलेली नाही, ‘डबल इंजिन’चे सरकार पूर्णपणे फेल झाले आहे, अशा शब्दांत पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले.




























































