आधार बायोमेट्रिक न केल्यास अनुदानित सिलिंडर मिळणार नाही, 1 ऑक्टोबरपासून नियमाची अंमलबजावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरबाबत 1 ऑक्टोबरपासून सरकारने नवा नियम लागू केला आहे. अनुदानित सिलिंडर हवा असेल तर तुम्हाला आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात सरकारने आज नवी नियमावली जारी केली.

सिलिंडरचा घरी पुरवठा होतो त्यावेळी किंवा वितरकाच्या कार्यालयात किंवा सरकारी गॅस कंपन्यांच्या मोबाईल अॅपवरून पडताळणी पूर्ण करता येईल.

…तर बाजारभावाने गॅस सिलिंडर घ्यावा लागेल

सध्या देशभरात 27.43 कोटी सक्रीय एलपीजी ग्राहक आहेत. त्यापैकी 89.9 टक्के ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केली आहे. मात्र, ज्यांनी ही पडताळणी केलेली नाही किंवा नकार दिल्यास त्यांना बाजारभावाप्रमाणे गॅस सिलिंडर मिळेल.