अ‍ॅपलची दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅपल कंपनीने अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. कंपनीने याआधी ऑगस्टमध्ये 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अ‍ॅपल कंपनीने फिटनेस प्लस विभागात ‘टाइम टू वॉक’ आणि ‘टाइम टू रन’सारख्या लोकप्रिय ऑडिओ फीचर्सवर काम करणाऱ्या ऑडिओ-कंटेंट टीममधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात केवळ फिटनेस पुरतीच मर्यादित नाही. यापूर्वी गेल्या ऑगस्ट महिन्यात कंपनीने एका मोठय़ा निर्णयात 200 हून अधिक कर्मचाऱअयांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.