
आधार कार्ड हरवले, पण तुम्हाला नंबर माहीत नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या किंवा जवळच्या केंद्रावर जाऊन ते परत मिळवू शकता.
नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला UIDI च्या वेबसाइटवर ‘माय आधार’ विभागात जाऊन ‘Retrieve Lost or Forgotten EID/UID’ पर्याय निवडा.
तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. त्यात आधारकार्डवरील नाव, लिंक असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी आणि Captcha कोड काळजीपूर्वक भरा.
“Send OTP” वर क्लिक करा, तुमच्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर एक OTP पाठवला जाईल. OTP टाकून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
पडताळणीनंतर आधार क्रमांक (UID) किंवा नोंदणी आयडी (EID) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर पाठवला जाईल.






























































