दुष्काळ आढावा बैठकीत झोपा काढल्या, अमरावतीच्या कार्यालयातील महिला अधिकारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत महिला अधिकारी झोपा काढत असल्याचे आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत अमरावती येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी शिल्पा जनक यांना निलंबित करण्यात आले आहे.

अमरावती येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयात वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा सहाय्यक भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत असणाऱया शिल्पा जनक या अकोला येथील आढावा बैठकीत झोपी गेल्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली होती. या पार्श्वभूमीवर  जनक यांना महाराष्ट्र नागरी सेवातील नियम 86 एक नुसार सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

कृषिमंत्री भरणे यांच्या बैठका वादात

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड, अकोला येथे दुष्काळी आढावा बैठका आयोजित केल्या होत्या, मात्र या बैठका विविध कारणांमुळे वादात सापडल्या. कुठे मंत्र्यांनी काजू, बदामवर ताव मारला म्हणून, तर कुठे अधिकारी भ्रमणध्वनी पाहत असतानाचे, झोपी गेल्याच्या चित्रफिती समोर आल्यामुळे या बैठका वादात सापडल्या होत्या.