
महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारीपदी कालच बैजयंत जय पांडा यांची नियुक्ती केल्यानंतर आज भाजपाने प्रदेश संघटनमंत्री या महत्त्वाच्या पदावर अजय जामवाल यांची नियुक्ती केली आहे. प्रदेश सहसंघटनमंत्रीपदी सतीश धोंड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षाचे मुख्य संघटनमंत्री बी.एल. संतोष दिल्लीतच बसणार असून, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश हे मुंबईतून तर दुसरे सहसंघटनमंत्री सौदानसिंह हे भुवनेश्वरमधून काम पाहतील. व्ही सतीश हे राष्टीय संघटक म्हणून दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातूनच काम पाहतील. पक्षाचे दुसरे संघटक नागेंद्र हेही दिल्लीमधूनच कार्यरत राहतील, असे या नियुक्तीप्रत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

























































