चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केल्याने चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी दुपारपासून आणि रविवारी मध्यरात्रीपर्यंत चारधाम यात्रा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पाच जिह्यांतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हवामान विभागाने रविवारसाठी डेहरादून, टिहरी, पौडी आणि हरिद्वारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर काशी, चमोली, नैनीताल आणि रुद्रप्रयागसाठी ऑरेंज तर बागेश्वर, अल्मोडा, चंपावत, उधमसिंह नगर आणि पिथौरागडसाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.