असं झालं तर… तुमचे व्हॉट्सऍप हॅक झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या व्हॉट्सऍप खात्यावर एखादे अनोळखी डिव्हाईस जोडलेले असणे, न पाठवलेला संदेश किंवा अचानक आलेला व्हेरिफिकेशन कोड ही हॅकिंगची लक्षणे असू शकतात.

सर्वप्रथम व्हॉट्सऍपचा ‘लिंक्ड डिव्हाईसेस’ विभाग तपासा. जर तुम्हाला असा संगणक, ब्राऊझर किंवा इतर डिव्हाईस दिसले जे तुम्ही जोडलेले नाही, तर हे गंभीर असू शकते.

कोणत्याही अनोळखी डिव्हाईसमधून तत्काळ लॉग आउट करा. खात्याच्या सुरक्षेसाठी जोडलेली डिव्हाईसेस नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर तुमचे मित्र/ कुटुंबीयांना तुमच्या नंबरवरून विचित्र संदेश मिळाला असेल तसेच तुमचा व्हॉट्सऍप प्रोफाईल फोटो, नाव, ‘अबाऊट’ / स्टेटसमध्ये बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका.

जर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर एखादी संशयास्पद फाईल उघडली असेल तर तुमची सिस्टम अपडेट करा आणि विश्वसनीय अँटी-मालवेअर सॉफ्टवेअरने स्कॅन करा.