अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 23 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक समिती स्थापन केली आहे.

या समितीत सदस्य म्हणून माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, आमदार अमित झनक, साजिद खान पठाण, अनिल मांगुळकर, धीरज लिंगाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, माजी महापौर विलास इंगोले आणि स्वाती वाकेकर अशा 11 सदस्यांचा समावेश आहे.