
अल्पवयीन आरोपी मुलांची कारच्या बोनोटला बांधून धिंड काढल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. 4 पोलीस अधिकारी आणि 11 पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली केली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीच्या बोनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर संबंधितांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.
बदली केलेले पोलीस अधिकारी–अंमलदार
स्नेहल थोरात (सहा. पोलीस निरीक्षक), नीलेश मोकाशी (पोलीस उपनिरीक्षक), अण्णा दराडे (पोलीस उपनिरीक्षक), सद्दाम हुसेन दस्तगीर फकीर (पोलीस उपनिरीक्षक) या अधिकाऱयांची विशेष शाखेत तर सुनिल हनवते (पोलीस हवालदार), दिनेश तापके (पोलीस हवालदार) यांच्यासह पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे, सोहम शेंडकर, मंगेश पवार, राहुल औंधकर, रवींद्र गायकवाड , संदिप आगळे, तुकाराम सुतार, सुवर्णा भिसे यांची मुख्यालयात बदली केली आहे.




























































