डीजेचा दणदणाट; मिरजेतील 46 जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश विर्सजन मिरवणुकीत डीजे-डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱया मिरज तालुक्यातील समडोळी, नांद्रे, कावजी खोतवाडी, इनामधामणी, कसबे डिग्रज येथील मंडळाचे पदाधिकारी व साऊंड मालक, ऑपरेटर, वाहनमालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 46 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

समडोळी येथील जय हो ग्रुपचे अध्यक्ष नरसू नेमाण्णा चव्हाण, संतोष बाळासाहेब पाटील, प्रशांत रावसाहेब देसाई, देवाप्पा श्रीपाल देसाई, शीतल गोपाल कोळी, चालक किरण अशोक राजोबा, डीजेमालक अभिजीत तानाजी जाधव, ऑपरेटर ओंकार संजय अडगळे (दोघे रा. सैदापूर, सातारा) यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी मनोज वाघमोडे यांनी फिर्याद दिली.

नांद्रे येथील मंडळाचे अध्यक्ष बसवराज सदाशिव मसुडगी, मल्लिकार्जुन शिवाप्पा सावळगी, शिवराज सदाशिव मसुडगी, काशिनाथ सिदाप्पा इडी, मनु रूद्राप्पा यळगुती, प्रशांत रामचंद्र बंडगर, सागर नागेश दळवाई, उमेश शिवाजी मदने यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी अक्षयकुमार माने यांनी फिर्याद दिली आहे.

समडोळीतील वाल्मीकी चौक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद दिलीप कोळी, साहिल शफीक फकीर, नितेश बाबुराव मस्कर, तुषार मारुती कोळी, वाहनमालक अभिजीत महादेव गवंडी, डीजेमालक समीर नसीर मुल्ला, ऑपरेटर ऋषिकेश प्रकाश कोळी (रा. कुंडल) यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी सचिन कोळी यांनी फिर्याद दिली आहे.

कावजी खोतवाडी येथील मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज हणमंतराव पाटील, ओंकार प्रताप निकम, प्रणव महादेव पाटील, वाहन व डीजेमालक प्रवीण राजकुमार कांबळे, ऑपरेटर रोहन राजाराम कांबळे (रा. सुभाषनगर) यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी यासिन फकीर यांनी फिर्याद दिली आहे.

इनामधामणी येथील मंडळाचे श्रमण आदिनाथ मगदूम, सुशांत सुंदर भोसले, शुभम आगळगावे, अविष्कार कांबळे, सुदर्शन शांतिनाथ मगदूम, सुधीर विवेकानंद रिसीव, निहाल अब्दुल भिलवडे यांच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक विजय घोलप यांनी फिर्याद दिली आहे.

कसबे डिग्रज येथील मंडळाचे कृष्णकांत यशवंत सायमोते, शुभम शिवाजी शेवाळे, ओंकार अशोक साठे, स्वप्नील राजेंद्र मगदूम, ओंकार विजय मगदूम, रेहमान रमजान मुल्ला, शुभम सुरेश बागणीकर, डीजे ऑपरेटर संकेत प्रमोद मासुले, डीजेमालक अभय दीपक मंडले, वाहनचालक प्रवीण अशोक कदम, वाहनमालक विशाल दत्तात्रय दळवी (रा. कसबे डिग्रज) यांच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी दीपक कदम यांनी फिर्याद दिली आहे.