अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, निर्माता वासू भगनानीशी संबंधित 12 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, निर्माता वासू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित 12 ठिकाणांवर आयकर विभागाने सोमवारी छापेमारी केली. चित्रपट प्रोजेक्टच्या नावाखाली परदेशात कथितरित्या पाठवलेल्या पैशांसंदर्भात मुंबई आयकर विभागाकडून ही कारवाई केली जात आहे.

चित्रपट चित्रीकरण, परदेशी वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे परदेशात पाठवले जात असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. रकुल प्रीत आणि भगनानी यांच्या संबंधित मुंबईतील विविध कार्यालये आणि संबंधित ठिकाणी मुंबई आयकर विभागाची अनेक पथके झडती घेत आहेत. या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर माहितीची तपासणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.