MPSC च्या तीन मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून आयोजित केलेल्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 , महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच परीक्षा पद्धतीबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीही लवकरच अपेक्षित आहेत.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना, पालक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आयोगाने या तीन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या?

1. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026

2. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026

3. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026

या तिन्ही परीक्षांच्या नव्या तारखांची प्रतीक्षा आता उमेदवारांना करावी लागणार आहे. आयोगाकडून सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.