Asian Games 2026 – टीम इंडिया राऊंडअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉकीत महिला अंतिम फेरीत

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाला 2-0 असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. तब्बल 44 वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या आशियाई सुवर्णपदकापासून हिंदुस्थानी संघ आता केवळ एक पाऊल दूर आहे. अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा चीनशी सामना होणार आहे.

लव्हलिना बोरगोहेन सुवर्णपदकाच्या दिशेने

हिंदुस्थानची स्टार महिला बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन अंतिम फेरीत पोहोचली आहे. उपांत्य फेरीत तिने कझाकस्तानच्या नतालिया बोगदानोव्हाचा 3-2 अशा स्प्लिट डिसिजनने पराभव केला. पहिली फेरी गमावल्यानंतर लव्हलिनाने जोरदार पुनरागमन करत पुढील दोन फेऱ्या जिंकल्या. यासह ती आता सुवर्णपदकाच्या ध्येयाने अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सुमित नागल उपांत्यपूर्व फेरीत

टेनिसमध्ये सुमित नागलने दणदणीत विजयासह पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुमित नागलने उझबेकिस्तानच्या सर्गेई पहमिनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. या हिंदुस्थानी खेळाडूने संपूर्ण सामन्यात संयम दाखवला आणि सरळ सेटमध्ये विजय मिळवून अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले.

स्क्वॉशमध्ये पुरुषांसह महिलांचे पदक निश्चित

हिंदुस्थानसाठी स्क्वॉशमध्ये बुधवारचा दिवस चांगला ठरला. कारण पुरुषांबरोबर महिलांच्या संघांनीही आपले पदक निश्चित केले आहे. हिंदुस्थानी पुरुष संघाने कुवेतला 2-0 ने हरवून पदक निश्चित केले आहे. हिंदुस्थानी महिला स्क्वॉश संघाने उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरला 2-0 ने पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रियाचे सुवर्णस्वप्न भंगले

महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रियाची प्रिया घंघास चीनच्या चेंग्यू यांगकडून 1-4 ने पराभूत झाली. या पराभवाने प्रियाचे अंतिम फेरीत पोहोचून सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. पण प्रियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून प्रियासाठी आधीच एक कांस्यपदक मिळवले होते. आता ती बॉक्सिंगमध्ये देशासाठी कांस्यपदक घेऊन मायदेशी परतणार आहे.