
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय)चे नाव बदलून सुपर इंटेलिजेंसन म्हणजेच ‘एसआय’ करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता अमेरिकन सरकारच्या अधिकृत पत्रव्यवहार, संकेतस्थळे, अहवाल आणि धोरणात्मक दस्तऐवजांमध्ये ‘एआय’ ऐवजी ‘एसआय’ नावाचा वापर केला जाणार आहे. विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि मानवी प्रयत्नांच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात अशी कामे शक्य होत आहेत, जी पूर्वी अशक्य मानली जात होती. त्यामुळे नाव बदलण्यात आल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.





























































