सुनीता अग्रवाल होणार सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजियमने गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. या निर्णयामळे आता सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या तीन होईल. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना या दोन महिला न्यायाधीश आहेत.

सुनीता अग्रवाल यांच्या नावासोबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र पुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्या नावांचीही शिफारस करण्यात आली आहे. तिघांची नियुक्ती झाल्यास सर्वोच्च न्यायालयातील एपूण न्यायाधीशांची संख्या 34 वरून 37 होईल.