सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटात बंडखोरी, भाजपचा आधार घेत पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. जगताप यांनी भाजपचा आधार घेत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच उमेदवार जाहीर करू, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.

भाजपच्या गोटात सामील झालेल्या जगताप यांनी लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल उभे केले असून, आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. तर अजित पवार गटाने शिंदे गटाशी युती केली आहे. अजित पवार गटाचे प्रवत्ते उमेश पाटील यांनी आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. युवा नेते जय पवार, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, नगराध्यक्ष सचिन सातव, सभापती किरण तावरे यावेळी उपस्थित होते. अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत पुरुषोत्तम जगताप यांना उमेदवारी दिली होती. पंरतु ते बंडावर ठाम राहिल्याने यादी बदलण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. पुरुषोत्तम जगताप यांनी पत्रकार परिषद घेत स्वतंत्रपणे पॅनेलची घोषणा केली.