
शॉपिंग असो वा ट्रव्हल वा एखाद्या आपत्कालीन स्थितीत क्रेडिट कार्ड स्वॅप केले की झाले. मात्र कधी कधी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास टाळाटाळ केल्यास मोठा भुर्दंड भरावा लागतो.
देय तारखेनंतर भारी विलंब शुल्क आणि उच्च व्याजदर लागू होतो. CIBIL स्कोअर खराब होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते.
सलग 6 महिने बिल न दिल्यास खाते डिफॉल्ट घोषित होते. आरबीआयच्या नियमानुसार, कार्ड मिळाल्यापासून 30 दिवसांत ऑक्टिव्ह न केल्यास बँक ते बंद करते.
ताबडतोब पूर्ण रक्कम/किमान रक्कम भरा आणि दंड व व्याज टाळण्यासाठी बँकेशी संपर्क साधा. बिल भरण्यास उशीर झाल्याची कारणे सांगा, लेट फी माफ करण्याची विनंती करा.
मोठी थकबाकी हप्त्यांमध्ये रूपांतरित करा. यामुळे दरमहा भरणा करणे सोपे होते. वैयक्तिक कर्ज घ्या. क्रेडिट कार्डाच्या उच्च व्याजापेक्षा पर्सनल लोनचे व्याज कमी असते.





























































