
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेचा प्रवास लवकरच आरामदायी बनणार आहे. मुंबईसाठी नियोजित 238 एसी लोकल गाडय़ांपैकी 20 एसी लोकल पुढच्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत मिळण्याची चिन्हे आहेत. पहिल्या 20 गाडय़ांची रचना सध्या मुंबईत धावत असलेल्या अत्याधुनिक एसी लोकलसारखीच असेल. मात्र, उर्वरित 218 एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सूचनांनुसार अनेक महत्त्वाचे बदल आणि अतिरिक्त सुविधांचा समावेश केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
























































