Asian Games 2026 – ‘गोल्ड’न फ्रायडे! बॉक्सिंगमध्ये एकाच दिवशी ‘सुवर्ण’पदकांची हॅटट्रिक; लव्हलिना, परवीननंतर अंकुशचं सोनेरी यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारचा दिवस हिंदुस्थानसाठी बॉक्सिगमध्ये महत्त्वपूर्ण ठरला. महिला बॉक्सिंगमध्ये लव्हलिना आणि परवीने हिने सुवर्ण पंच लगावला. त्यानंतर 21 वर्षीय अंकुश पांघल याने 80 पुरुषांच्या 80 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकत आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले. हरयाणाच्या या स्टार खेळाडूने दक्षिण कोरियाच्या किम मिन्सॉन्ग याचा पराभव करत सुवर्ण जिंकले. विशेष म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही अंकुशने सुवर्णपदक जिंकले होते.

अंकुश पांघल हा यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला पुरूष खेळाडू ठरला आहे. अंतिम लढतीत त्याने दक्षिण कोरियाच्या किमचा 4-1 असा पराभव केला. विशेष म्हणजे 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम पांघल याने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आठ वर्षांनी पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळाले आहे.

Asian Games 2026 – कांस्यपदक काढून घेतलं, 22 महिन्यांची बंदी घातली ; ऑलिम्पिकला मुकलेल्या परवीनचा सुवर्ण ‘पंच’!

अंतिम लढतीत अंकुश पांघल याने कोरियाच्या बॉक्सरवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पहिल्या फेरीत त्याने 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपली पकड अधिक घट्ट करत 5-0 असे गुण मिळवले. त्यानंतर तिसऱ्या फेरीतही आपला आक्रमक खेळ कायम ठेवत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

अंकुशच्या यशामुळे हिंदुस्थानच्या पदकांचा आकडा 74 वर पोहोचला आहे. यात 14 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. अंकुश आधी बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानने दोन कांस्यपदकं जिंकली होती.

Asian Games 2026 – 7 गुणांची पिछाडी, मग सलग 8 गुणांची कमाई; ऑलिम्पिक विजेत्याला चितपट करत सुजीत कलकलची ‘सुवर्ण’ला गवसणी