Ratnagiri News – मिनी महाबळेश्वर दापोली हरवले धुक्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंड हवेचे ठिकाण म्हणून गणल्या गेलेल्या मिनी महाबळेश्वर अर्थातच कॅम्प दापोलीत चक्क शुक्रवारी सकाळी दापोली वासीयांना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली पाहावयास मिळाली. धुके इतके दाट होते की सकाळच्या सत्रात काही वेळ विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण व जिकिरीचे होऊन बसले होते.

धुक्यामुळे दापोली शहरातून मार्गस्थ होणाऱ्या तसेच दापोलीत आलेल्या वाहनांना आपल्या ताब्यातील वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. ऑक्टोबरची हिट सुरु झाल्याने नागरिक गरमीने हैराण झाले असताना शुक्रवारी सकाळीच पसरलेल्या दाट धुक्याच्या गारव्याने सुखद आनंददायी वातावरण तयार झाले होते.