
हमारे वोट का हिसाब… हमें दे दो ज्ञानेश कसाब, एक जिया दोन अजवाईन… ज्ञानेश कुमार दो रिजाईन, एक बिस्किट दोन चाय… ज्ञानेकुमार बाय बाय, ग्यानू बाबु इट्स डन ब्रो, एक चाय दोन खारी, ग्यानू अब तेरी बारी… अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा आसमंत दणाणला. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला. सीजेपीच्या या आंदोलनात शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित होते. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना बरं वाटत नसल्याने ते आंदोलनासाठी येऊ शकले नाही. शिवसेनेचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा राहील, असे आमदार महेश सावंत यांनी सांगितले.
या आंदोलनात बॉलिवूडमधील कलाकर नसीरुद्दीन शाह, शबानामा आझमी, गायक विशाल ददलानी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे कामाठी पुरातील महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच रखरखत्या उन्हात सकाळपासूनच आंदोलक शिवाजी पार्कवर धडकत होते. कोणालाही कसला त्रास झाल्यास संबंधितांना तत्काळ उपचार मिळावे याकरिता नवी मुंबईतले डॉ नितीन दिघे व खोपोली येथील डॉ. पठाण हे आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन तैनात होते. सकाळ पासून ३५० ओआर एसचे पाऊच वाटण्याबरोबर अंगदुखी वगैरेंचे औषधं दिली. ही वैद्यकीय सेवा त्यांनी स्वखर्चाने स्वयंप्रेरणेने केली.





























































