टँकर उलटले, तेलासाठी झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आग्रा येथे शनिवारी सकाळी पेट्रोलने भरलेला टँकर उलटला. या दुर्घटनेत टँकरची टाकी फुटल्याने पेट्रोल रस्त्यावर वाहू लागले. याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांची झुंबड उडाली. लोकांनी कॅन-डब्यांमध्ये तेल भरले. एतमादपूर इंडियन ऑइल डेपोमधून टँकरमध्ये 3 हजार लिटर पेट्रोल आणि 9 हजार लिटर डिझेल भरले होते, असे टँकरचालक शिवदत्त याने सांगितले. टँकरची टाकी फुटल्याने 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले.