एआय चिप बनवणाऱ्या सीईओंची संपत्ती 200 अब्ज डॉलरपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयची चिप बनवणारी कंपनी एनव्हिडिया कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग यांची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, हुआंग यांची संपत्ती वाढून 203.2 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 17 लाख कोटी रुपये झाली. या वाढीसह ते जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

शुक्रवारच्या व्यवहार सत्रात एनव्हिडियाचा शेअर 237 डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. त्यामुळे हुआंग यांच्या संपत्तीत एका दिवसात 3.4 अब्ज डॉलरची वाढ झाली. मात्र, नंतर शेअर उच्च पातळीवरून थोडा घसरला आणि 1.3 टक्के वाढीसह 233.95 डॉलरवर बंद झाला. जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हिडियाची स्थापना केली होती आणि त्यांच्याकडे कंपनीतील जवळपास 4 टक्के हिस्सेदारी आहे.