‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनाला राहुल गांधी यांचा पाठिंबा, एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गैरकारभाराविरोधात परीक्षार्थींचा असंतोष वाढला असून विद्यार्थ्यांचे पुण्यात एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थी तीन दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. दुसरे आंदोलन शास्त्री रस्त्यावर, तर तिसरे आंदोलन टिळक चौकात सुरू आहे. या आंदोलनाची दखल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली असून पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी नुकतीच चर्चा केली. पेपरफुटीसंदर्भात आयोगाचे अध्यक्ष, सचिव, इतरांची न्यायालयीन चौकशी, सुमारे 70 हजार जागा भरण्यासह आगामी तीन वर्षांच्या रिक्त जागा आधीच जाहीर करून एक महिन्याच्या आत त्याचा संपूर्ण कार्यक्रम आखणे, सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. त्यानंतर 2 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मान्य केली नसल्याने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन सुरू केले आहे.

अध्यक्षांचा राजीनामा घ्या!

‘पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावेळी मी मुख्यमंत्र्ॊयांना एमपीएससीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐका, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीही कारवाई न केल्याने विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून, एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे.