
भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत थोड्याच वेळात शिवसेना-मनसेची गगनभेदी ‘गर्जना’ घुमणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते महापालिका असा विराट मोर्चा निघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असून शिवसैनिक, मनसैनिकांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
- मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळी दाखल
- गर्जना मोर्चास्थळी तरुणाने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष
गर्जना मोर्चास्थळी तरुणाने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष
मोर्चाचे सर्व अपडेट्स मिळवा एका क्लिकवर –
https://t.co/bcjq1AcNfC https://t.co/LOH7Jvij1u— Saamana Online (@SaamanaOnline) October 4, 2026
- चाटेशकुमार हटाओ, देश बचाओ… आली रे आली, ज्ञानुची बारी आली… अशी घोषणाबाजी.

- गर्जना मोर्चास्थळी नागरिक वेगवेगळे लक्ष्यवेधक पोस्टर घेऊन हजर

- ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा! गर्जना मोर्चास्थळी जेनझींच्या टीशर्टने वेधले लक्ष
ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा! गर्जना मोर्चास्थळी जेनझींच्या टीशर्टने वेधले लक्ष https://t.co/EyaBpaVSWw
— Saamana Online (@SaamanaOnline) October 4, 2026
- भ्रष्ट निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध ‘गर्जना’ मोर्चाला प्रचंड गर्दी, तुफान घोषणाबाजी
भ्रष्ट निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध ‘गर्जना’ मोर्चाला प्रचंड गर्दी, तुफान घोषणाबाजी https://t.co/LySEjHv7oq
— Saamana Online (@SaamanaOnline) October 4, 2026
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना
- डुप्लिकेट ज्ञानेश कुमार यांना घेऊन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे शिवसैनिकांसह गर्जना मोर्चाकडे रवाना
-
डुप्लिकेट ज्ञानेश कुमार यांना घेऊन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे शिवसैनिकांसह गर्जना मोर्चाकडे रवाना https://t.co/3V8d1qhtdj
— Saamana Online (@SaamanaOnline) October 4, 2026
- ज्ञानेश कुमार राजीनामा द्या… आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी
भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आयोजित शिवसेना-मनसेचा गर्जना मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकं जमा झाली आहेत. या
ठिकाणी आंदोलकांकडून ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, अशा जोरदार घोषणा देण्यात येत आहे. https://t.co/F5weMqx0oE— Saamana Online (@SaamanaOnline) October 4, 2026




























































