हे करून पहा…काळसर कोपरांमुळे त्रस्त आहात ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे हाताची त्वचा टॅन होते. अशा वेळी तुम्हाला जर हाताच्या कोपराच्या काळसरपणा घालवायचा असेल तर घरच्या घरी काही उपाय करता येतील.

– एका भांडय़ात एक चमचा नारळाचे तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा अक्रोड पावडर घालून मिश्रण नीट एकजीव करा. आता ही तयार झालेली पेस्ट कोपरांवर लाऊन थोडा वेळ तशीच ठेवावी. वाळल्यानंतर हात व कोपर स्वच्छ धुवावे. असे केल्याने हळूहळू कोपरांचा काळेपणा दूर होईल.