
प्रदीप पुर्णेकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला ते पिस्तूल तसेच मोबाईल पोलिसांनी आज कर्नाळय़ाच्या जंगलातून जप्त केले. आरोपी नितेश पवार याने हे पिस्तूल वापरले होते. तसेच दुसरा आरोपी निखिल यादव वापरत असलेला मोबाईलही ताब्यात घेण्यात आला आहे. पुर्णेकर यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी पिस्तूल व मोबाईल जंगलात फेकून दिले होते. मात्र ठाणे क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने हे सर्व साहित्य जप्त केल्याने पुर्णेकर हत्याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील फरार आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली हा पोलिसांना गुंगारा देत असून हेल्मेटधारी अन्य आरोपीची ओळख पटलेली नाही. टल्लीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके राज्यात विविध ठिकाणी तर दोन पथके नेपाळच्या दिशेने रवाना झाली




























































