
दिव्यांग व्यक्तीच्या स्वावलंबनाचा आधार असलेल्या व्हीलचेअरच्या हाताळणीतच निष्काळजीपणा झाल्याचा गंभीर आरोप अखिल हिंदुस्थानी पिकलबॉल असोसिएशन आणि एशियन पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी एअर इंडिया एक्स्प्रेसवर केला आहे. 100 टक्के शारीरिक दिव्यांग असलेल्या प्रभू यांच्या व्हीलचेअरचा महत्त्वाचा भाग विमान प्रवासादरम्यान गहाळ झाला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार लक्षात आल्यानंतर समस्या सोडविण्यासाठी त्यांना दोन तासांहून अधिक काळ थांबावे लागले.
प्रभू हे 10व्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी कोचीला गेले होते. 5 ऑक्टोबर रोजी आयएक्स1800 विमानाने मुंबईत परतल्यानंतर व्हीलचेअरचा भाग गायब असल्याचे आढळले. तक्रारीनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसने प्रॉपर्टी इर्रेग्युलॅरिटी फॉर्म (पीआयआर) जारी केला. मी माझ्या व्हीलचेअरवर पूर्णपणे अवलंबून आहे. मग विमान पंपनी इतकी निष्काळजी कशी? असा संतप्त सवाल प्रभू यांनी केला. विमान पंपनीच्या कर्मचाऱयांसह पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडूनही (सीआयएसएफ) अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. गहाळ भाग तातडीने शोधून परत करावा, व्हीलचेअर हाताळणीबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
































































