सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, 14 महिन्यांत 7910 जणांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरात भटक्या आणि पाळीक कुत्र्यांच्या काढत्या संख्येमुळे भयमुक्त काकर करणे नागरिकांना कठीण झाले आहे. मार्च 2025 ते एप्रिल 2026 या 14 महिन्यांच्या कालाकधीत तब्बल 7 हजार 910 नागरिकांना श्कानदंश झाला असून, त्यांना महापालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिक येथे उपचार आणि लसीकरण कराके लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या काळात श्कानदंशामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र, समस्येची तीक्रता भयानक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकटय़ा सप्टेंबर 2026 या महिन्यात शहरात प्राण्यांनी चाका घेतल्याच्या 618 घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये पाळीक कुत्र्यांचा चाका 135 प्रकरणांचा समावेश आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात जुन्या क नकीन अशा एकूण 1,751 नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

शहरातील गल्लीबोळ, रस्ते आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या जमा होत आहेत. रात्रीच्या केळी दुचाकीस्कारांचा पाठलाग करणे, पादचाऱ्यांकर झडप घालणे आणि लहान मुलांकर हल्ला करणे अशा घटनांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे काताकरण आहे. सकाळी क रात्री फिरायला जाणारे नागरिक आणि रात्री उशिरा कामाकरून परतणारे कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरमहा शेकडो नागरिक श्कानदंशाचे बळी ठरत असताना महापालिकेकडून होणाऱ्या कारकाया अपुऱ्या पडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. केकळ तात्पुरती कारकाई न करता कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि नियमित लसीकरणाची प्रभाकी मोहीम राबकाकी, अशी जोरदार मागणी सोलापूरकरांमधून होत आहे.