ठाणे झेडपीच्या लिपिकांचे वेतन थकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदेच्या सुमारे नऊ हजार लिपिकांचे वेतन थकले असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन व भत्ते रखडवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. लेखापरीक्षणातील आक्षेपांची पूर्तता न झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने पगार लटकवला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान थकीत वेतन दोन दिवसांत द्या अन्यथा कामबंद आंदोलन करू, असा इशारा संतप्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे. ठाणे जिल्हा परिषदेसह पाच पंचायत समित्यांमधील तब्बल नऊ हजार लिपिकांचे सप्टेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही.