
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आणि मोर्चा अपेक्षित आहे.
इंडिया ब्लॉकचे वरिष्ठ नेते ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत एकत्र येऊ शकतात,अशी माहिती मिळत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना दिल्लीतच थांबण्यास सांगितले आहे. ९ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांकडून एखादा मोठा कार्यक्रम किंवा मोर्चा होण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना जनपथ रोडवरील सागर रत्ना येथे दुपारी जेवणासाठी येण्यास सांगितले आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढला. आता, विरोधी पक्षाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींसोबत बैठकीची मागणी केली आहे.


























































