। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमु शारदा मूळ चत्वार वाचा। या पहिल्याच मनाच्या श्लोकात आपण परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचांचा परिचय करून घेतला होता. समर्थ म्हणतात, ‘ज्याच्या परावाणीतच खोटेपणा नाही तर तीनही वाचेतून तो खोटेपणा येणार कसा? सरळ मनाचा माणूस जो ईश्वराचा दास असतो, त्याला सर्वाभूती परमेश्वर दिसतो. त्याची द्वैत बुद्धी नाहीशी झालेली असते. चंद्र, सूर्य, तारे, नदी, नाले यांची समदृष्टी त्याने धारण केलेली असते. त्यामुळे गरीब -श्रीमंत, लहान-थोर असा भेदभाव तो करीत नाही. तो सर्वांशी प्रेमाने वागतो. त्याच्या मनात कोणाबद्दल शंका- कुशंका, द्वेष, ईर्षा, मत्सर नसतो. ‘तो’ सरळ वागणारा, खोटे न बोलणारा, सत्य पण गोड बोलणारा माणूस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. तोच माणूस सर्वोत्तमाचा दास असतो. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला, दिन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी, फोडी पाझर पाषाणाला, जनसेवेचे बांधूनी कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपले हृद्सिंहासन, नीत भजतो मानवतेला’ (गीतः पी. सावळाराम ) हीच भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये आहेत. नीतिमूल्य स्थिर असतात. आपण त्यांच्यापासून दूर होतो, ढळतो.म्हणून समर्थांसारख्या महानुभावांना मनाचे श्लोक लिहून हा बोध करावा लागतो. ?

– संध्या शहापुरे