अभिजित दीपके यांना अटक, CJP आंदोलनाचे नेतृत्व लातूरचा तरुण करणार; कोण आहे अजिंक्य शिंदे? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात घुसून त्यांना ताब्यात घेतल्याने वातावरण तापले आहे. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार असा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र दीपके यांना ताब्यात घेताच सीजेपीने एक आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडीओ शेअर करत आंदोलनाचे नेतृत्व 35 वर्षीय अजिंक्य शिंदे करेल हे स्पष्ट केले.

सीजेपीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिजित दीपके आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार असल्याचे जाहीर करतात. हा व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला आहे. हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ मला, सौरव दास आणि आशुतोष रांका असे आम्हा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आमच्या अटकेनंतर आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्या हाती असेल. तेच देशव्यापी लढ्याचे नेतृत्व करतील, असे या व्हिडीओमध्ये दीपके म्हणतात.

कोण आहे अजिंक्य शिंदे?

अजिंक्य शिंदे हा उच्चशिक्षित तरुण असून राजकारणाच्या मैदानात येण्याआधी तो आयटी कंपनीमध्ये काम करत होता. तो मूळचा महाराष्ट्रातील लातूर येथील असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड येथून बीटेक पदवी प्राप्त केली आहे. सध्या तो सीजेपीमध्ये राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून कार्य करतो. सीजेपीमध्ये येण्याआधी तो आम आदमी पार्टीच्या युथ विंगचा संयोजकही होता. सध्या तो सीजेपीचा मुख्य रणनीती कार असून दीपकेचा चांगला मित्रही आहे. सीजेपीचा विस्तार करण्याची जबाबदारी त्याच्या आहे. आता आंदोलनाचे नेतृत्वही तोच करणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

CJP Protest – जंतरमंतरकडे निघालेल्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, बार असोसिएशनची सरन्यायाधीशांकडे धाव