
हिंदुस्थानी वंशाच्या दक्षिण आफ्रिकन कायदेतज्ज्ञ नवी पिल्ले यांना नोबेल शांतता पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला फक्त एक नाही, तर आठ नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवे होते, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आठ युद्धांव्यतिरिक्त, मी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवले आहेत. ज्यांना पुरस्कार दिला ती महिला कोण आहे? मी तिला ओळखत नाही, आणि जनतेलाही तिच्याबद्दल काही माहिती नाही. तरीही, तिला नोबेल पुरस्कार देण्यात आला, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, पिल्ले यांच्याबद्दल कोणीही ऐकलेले नाही. माझ्या माहितीनुसार, त्या इस्रायलच्या विरोधक आहेत. त्यांनी नेमके काय केले हे देखील कोणाला माहीत नाही. मात्र, मी आठ युद्धे थांबवली आहेत. मी ज्या सर्व देशांना मदत केली, त्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी नॉर्वेजियन नोबेल समितीला पत्रे पाठवली आहेत. मी इराण आणि रशिया/युक्रेनसोबतची आणखी दोन युद्धे सोडवणार किंवा जिंकणार आहे. तथापि, मी सोडवलेली आठ युद्धे हा खरा मुद्दा आहे. यापैकी, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध विशेष महत्त्वाचे आहे. हे युद्ध थांबवणे हेच नोबेल पारितोषिकासाठी पात्र ठरण्यास खरोखर पुरेसे आहे, असे ते म्हणाले.



























































