
उत्तराखंडमध्ये शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. उत्तरकाशी आणि बागेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांचे भीतीचे वातावरण पसरले आहे. बागेश्वरमध्ये सकाळी 2.8 रिश्टर स्केलचा तर उत्तरकाशीमध्ये रात्री 8.08 वाजता 4.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.




























































