विमान कंपन्यांनी संधी साधली, भाडे वाढवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका घेऊन केंद्र सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वेगाडय़ा रोखल्या, बसेस बंद केल्या, रिक्षा आणि टॅक्सी बंद केल्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यातच विमान कंपन्यांनी संधी साधत विमानाचे भाडे कैकपटीने वाढवले.

वाराणसीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे भाडे थेट 14 हजारांपर्यंत पोहोचले. वाराणसी ते दिल्ली जाणाऱ्या प्रवासासाठी तत्काळ बुकिंगचे भाडे शनिवारी 15 टक्क्यांनी महागल्याचे दिसले. रेल्वे बंद करण्यात आल्याने अनेक जणांनी विमानांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिले.