टँकरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू, जीवदानीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरार येथील कोपरी नाका परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यात मायलेकाचा मृत्यू झाला. कविता पाल (29) आणि आरायू पाल (4) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे पाल कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

गावराईपाडा येथे राहणाऱ्या कविता पाल या आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरून जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जात होत्या. त्या कोपरी नाका येथे पोहोचल्या असता भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अपघाताची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील मायलेकाचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.