
कौटुंबिक कार्यक्रमाहून परतत असताना डिव्हायडरला धडकल्यानंतर इलेक्ट्रिक कारला आग लागली. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जागरणन दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील विजयवाडा येथे मंगळवारी ही घटना घडली. कारमधील सर्वजण नाम्बुरु येथे कौटुंबिक कार्यक्रमाला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
























































