
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून अवैध ठरविण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार पडळकर यांनी मोठी प्रतिष्ठा निर्माण केली होती. जोरदार शक्तिप्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बँक ताब्यात घेण्याचे मनसुबेही भाजपने रचले होते.

























































