दीड वर्षाच्या मुलीचे नेत्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणामध्ये एका दीड वर्षाच्या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. आस्था असे या मुलीचे नाव आहे. तिची अचानक प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयाने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला पीजीआयमध्ये दाखल करण्यासाठी पाठवले, मात्र रस्त्यातच मुलीने अखेरचा श्वास घेतला. हे कुटुंब एका सामाजिक संस्थेशी जोडलेले आहे. त्यांनी आधीच मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे. रोहतक जिह्यात दीड वर्षाच्या मुलीच्या नेत्रदानाचे हे पहिले प्रकरण आहे.