‘एसएचएम शिपकेअर’चा मुंबईत समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जहाजबांधणी, दुरुस्ती, व्यवस्थापन आणि सागरी सुरक्षा उपाययोजनांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘एसएचएम शिपकेअर’ कंपनीने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने दादर कीर्ती कॉलेज समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. कंपनीचे अध्यक्ष सैफुद्दीन हाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. वाढत्या प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती घडवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत स्वयंसेवकांनी एकत्र येत किनाऱ्यावरील प्लॅस्टिक, कचरा आणि अवशेष गोळा केले. सुरत आणि गोव्यानंतर कंपनीने आयोजित केलेल्या उपक्रमाचा हा तिसरा टप्पा होता.